BSNL ची धमाकेदार ऑफर: सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत पाहा लाईव्ह टीव्ही चॅनेल्स

BSNL ने दिली धमाकेदार सुविधा, सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत पाहू शकणार लाईव्ह टीव्ही चॅनेल्स, जाणून घ्या कसे

 


BSNL ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन खास सेवा सादर केली आहे, ज्यामध्ये यूजर्स सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहू शकतील. भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ची ही सेवा कशी वापरता येईल, चला जाणून घेऊया...

BSNL ने पुन्हा एकदा आपल्या यूजर्सला मोठं सरप्राइज दिलं आहे. आता तुम्ही सेट-टॉप बॉक्सशिवाय मोफत सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल्स पाहू शकणार आहात. BSNL ने आपल्या यूजर्ससाठी लाईव्ह टीव्ही अ‍ॅपची घोषणा केली आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही तुमचे आवडते टीव्ही चॅनेल्स पाहू शकाल. BSNL ची ही लाईव्ह टीव्ही सेवा इंटरनेट टीव्ही प्रोटोकॉल (IPTV) च्या अपग्रेडची आहे, ज्यासाठी यूजर्सना कोणत्याही सेट-टॉप बॉक्सची गरज नाही.

सरकारी टेलीकॉम कंपनीने आपली ही लाईव्ह टीव्ही सेवा सध्या मध्यप्रदेश टेलीकॉम सर्कलमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत हँडलवरून सांगितले की, ही वायरलेस लाईव्ह टीव्ही सेवा FTTH म्हणजेच फायबर-टू-द-होम इंटरनेट सेवेच्या माध्यमातून ॲक्सेस केली जाईल. यासाठी यूजर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

https://x.com/BSNLCorporate/status/1832692590052872218


सध्या BSNL ची लाईव्ह टीव्ही सेवा फक्त FTTH कनेक्शन असलेल्या यूजर्सना टेस्टिंगसाठी ऑफर केली जात आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या Android TV 10 किंवा त्याहून वरच्या व्हर्जन असलेल्या स्मार्ट टीव्हीमध्ये ॲक्सेस करू शकता. या सेवेला कसे वापरायचे, याची माहिती कंपनीने शेअर केली आहे.

 

असा करा वापर:

- BSNL ची ही नवीन लाईव्ह टीव्ही सेवा वापरण्यासाठी यूजर्सनी आपल्या स्मार्ट टीव्हीमध्ये BSNL LiveTV अ‍ॅप डाउनलोड करणे आवश्यक आहे.

- BSNL ने आपले हे लाईव्ह टीव्ही अ‍ॅप Google Play Store वर उपलब्ध केले आहे.

- तुमच्या स्मार्ट टीव्हीमध्ये Android 10 किंवा त्याहून वरचा ऑपरेटिंग सिस्टम असला पाहिजे, तरच तुम्ही ही सेवा वापरू शकता.

- मोफत लाईव्ह टीव्ही सेवा वापरण्यासाठी तुमच्याकडे BSNL चे FTTH ब्रॉडबँड कनेक्शन असणे आवश्यक आहे.

- अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला '9424700333' या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा लागेल.

- त्यानंतर तुम्ही या सेवेसाठी स्वतःला रजिस्टर करू शकाल.

- BSNL कडून तुम्हाला यासंदर्भात मेसेज प्राप्त होईल.

Comments

Promote Your Links Here for Free