आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिक स्वातंत्र्य हवे आहे. अनेक लोक "लवकर श्रीमंत कसे व्हावे?" याचे उत्तर शोधत असतात. पण जगातील यशस्वी ट्रेडर आणि गुंतवणूकदार मार्क मिनर्विनी यांचे मत थोडे वेगळे आहे. त्यांच्यानुसार श्रीमंती ही एखादी घटना नसून, योग्य सवयी, कौशल्य आणि दीर्घकालीन विचारसरणीचा परिणाम आहे. मी मध्ये एक त्यांच्यावर लिहिलेली सोशल मीडिया पोस्ट वाचली होती फकेबुक वर, त्यातीलच काही मुद्दे मी इथे देत आहे. चला तर मग, त्यांच्या ९ महत्त्वाच्या शिकवणी समजून घेऊया. १. जिथे पैसा आहे तिथे जा जर तुम्हाला मोठ्या संधी मिळवायच्या असतील तर स्वतःला अशा क्षेत्रात ठेवले पाहिजे जिथे वाढीची क्षमता आहे. आजच्या काळात तंत्रज्ञान, व्यवसाय, गुंतवणूक, ट्रेडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाइन सेवा या क्षेत्रांमध्ये अमर्याद संधी आहेत. अनेक लोक कमी संधी असलेल्या ठिकाणी आयुष्यभर मेहनत करतात, पण योग्य क्षेत्र निवडत नाहीत. आपण योग्य क्षेत्र निवडणे हे यशाच्या प्रवासातील पहिले पाऊल आहे. २. पैशाच्या मागे धावू नका, तर कौशल्याच्या मागे धावा बहुतेक लोकांचा फोकस पैशावर असतो. पण खरे यशस्वी लोक त्यांच्या कौशल्यावर लक्...
- Get link
- X
- Other Apps